फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

Tuesday, October 27, 2009

पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो.

मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.

तिकडे आपण पिरंगुट, माले, मुळशी, वारक, चाचवली अशी गावे मागे टाकत, मुळशी धरणाच्या पाण्याला वळसा घालून गेलो की एक रस्ता पुलावरुन डाव्या हाताला लोणावळ्याकडे जातो. त्या रस्त्याने पुढे गेले की
एक देवराई लागते. मग एक श्रीमंत लोकांचा योगा आश्रम आणि एक लहानसे पठार लागते. तिथे एक मोठी दरी (घळ) आहे जिथून खाली कोकणाचा नजारा दिसतो. थोडे अजुन पुढे गेलात की डाव्या हाताला एक-दोन तलाव आहेत. पहाटे सुर्योदयापूर्वी पोचले तर तलावाचे पाणी अगदी काच लावल्यासारखे संथ असते. माग हळूहळू जसा जसा सूर्य वर येतो तसातसा निसर्गाचा एक पट आपल्यसमोर उलगडतो.

तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा.













तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा...

© या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com

14 comments:

angel Oct 28, 2009 12:50:00 PM  

Awesome place. and as usual lovely landscapes captured!!! :)

सिद्धार्थ Oct 28, 2009 9:52:00 PM  

पुन्हादा सांगतोय... तुझा तिसरा डोळा लय भारी हाये लेका. मस्तच आहेत फोटो. तुझ्याबरोबर कधी कुठे ट्रेकला जायला मिळालं तर खरचं खूप मज्जा येईल.

कांचन कराई Oct 28, 2009 10:34:00 PM  

कोणत्या फोटोला जास्त छान म्हणू? सर्वच सुंदर आहेत.

Yogesh Oct 31, 2009 12:04:00 AM  

waaaa....ati sundhar aahe photo

Roops Oct 31, 2009 8:32:00 AM  

hats off to u..!! khup chan lihitos ani photography hi titkich chan kartos :)

Smit Gade Nov 8, 2009 9:24:00 PM  

agadi bhaari..uccha ahet sarva photos..

Anonymous,  Nov 12, 2009 4:22:00 AM  

bhannat... mastach re !
landscapes amazing aalet !

~ Samyak.

ajay Feb 1, 2010 11:10:00 PM  

Hiii

Plz Visit to Ratangad.

me sure ahe khup chan photo kadhayala chance milel.
me pan kahi photo kadhale ahet tikade

Sharmila Feb 13, 2010 4:33:00 PM  

hi....khup mast ahet sagle snaps.......can i ask 1 question ..which camera u r using ????????
cheers...

Post a Comment