२६/११ च्या वीरांना सॅल्युट...!!!

Wednesday, November 25, 2009


आज एक वर्ष झालं...

हिजड्यांनी भ्याड हल्ला केला होता.  @#$*मध्ये दम नव्हता म्हणून भर समुद्रात मच्छीमार बोटीचे अपहरण करुन गुपचुप आले आणि तीन दिवस थैमान घातले. मध्यमवर्गीय रेल्वे प्रवासी, महागड्या स्कोडाने फिरणारे श्रीमंत, रेल्वे स्टेशनवर झोपणारे गरीब, गस्तीवरचे पोलीस, अगदी प्रार्थनास्थळे आणि लहानगा ’मोशे’ काहीही मागे पुढे न पाहता अमानुष गोळीबार आणि ग्रेनेडचे हल्ले सुरु केले. एकच लक्ष होते सीएसटीच्या चाकरमान्यापासून ताज-ओबेरॉयमध्ये राहणाऱ्या देशी-परदेशी उच्चभ्रू वर्गापर्यंत दहशत पसरवणे. अगदी गुर्मीत, माज आला होता. नावात पाक असले तरी इरादे किती नापाक? अगदी मुक्काम ठोकण्याच्या तयारीनेच आले होते. पहिला हल्ला झाल्यावर कामा हॉस्पिटलला दाखल झालेले जखमी पण लक्ष केले. किती राक्षसीपणा.

पण आपले ढाणे वाघ होते की. तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे आणि अशोक कामठे यांच्या बरोबरच विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन असे आमचे वाघ चवताळून उठले. हेमंत करकरेंनी बुलेटप्रुफ जॅकेट घालून लढताना, साळसकरांनी आणि कामटेंनी प्राणांचीही पर्वा न करता या कुंडात देहरुपी कुडीची आहुती देताना काय विचार बरे केला असेल? माझ्या आईवर संकट आलंय आणि ते मलाच दूर केले पाहिजे असेच तर वाटले असणार ना?

एनएसजी आणि मार्कोसच्या शौर्याला तर तोड नाही. विश्वास नांगरे पाटलांच्या रुपाने मराठी वाघ काय चीज असते ते साऱ्या जगाने पाहिले. दोन साथीदारांसमोर  एकच वाक्य टाकले, "मरायची यापेक्षा चांगली वेळ येणार नाही". त्या शब्दांनी समाधान मोरे आणि अंबादास पवार यांच्यात स्फुल्लिंग चेतले नाही तरच नवल. फक्त हातात एक सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन सगळा ताज पालथा घालताना आणि सैतानाशी मुकाबला करताना आम्ही स्वतः टीव्हीवर पाहिलंय. तुकाराम काकांनी कसाबवर झडप घातली म्हणून तर आज तो कायद्यापुढे फाशीची भीक मागत उभा आहे. जखमी साथीदाराला वाचवण्यासाठी स्वतः सैतानाशी दोन हात करणारा आणि "डू नॉट कम, आय विल हॅंडल देम" असे ठणकावून सांगणारा संदीपही लक्षात सदैव राहिल.

हेमंत करकरे
अशोक कामटे

मेजर संदीप उन्नीकृष्णन
विजय साळसकर
शशांक शिंदे
बापूसाहेब दुरुगडे
प्रकाश मोरे
तुकाराम ऒंबळे
अरुण चित्ते
अंबादास पवार
जयवंत पाटील
योगेश पाटील
विजय खांडेकर
एम. सी. चौधरी
राहुल शिंदे
मुकेश जाधव

या वीरांचा मुंबई आणि महाराष्ट्रच काय पण सगळा देश ऋणी राहील.

आणि हो त्या तिकडच्या जुल्मीस्तानला एकच सांगणे आहे, आमच्याच फेकलेल्या तुकड्यांवर तुमचा देश बनलाय. इकडे आमच्यात कितीही भांडणे असोत, पण जेव्हा आईवर संकट येते ना तेव्हा कुणाच्या बापाला भीत नाही आपण...!!! हिंमत असेल तर समोर येऊन लढून दाखवा.


Read more...

खा लेकहो... खा...!!!

Sunday, November 22, 2009

फोटोशूट्स, विविध एव्हेंट्स आणि ट्रेक्सच्या दरम्यान पुण्यात आणि पुण्याबाहेर भटकंती करताना अनेकदा घराबाहेर खाण्याची वेळ येते. अशा वेळी मग नेहमीच्याच खाण्याला वेगळी चव देणारी ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न होतो. बऱ्याच वेळा आमची निवड चुकतेही. पण ज्या काही यशस्वी निवडी आम्ही शोधल्यात त्यातल्याच काही इथे मांडण्याचा एक चवदार उपद्व्याप.


सुरुवात करु सकाळच्या चहापासून. पहाटे साडेतीन-चारला पुण्यात २-३ ठिकाणीच चहा मिळतो. डेक्कन
चौकात पेपरवाल्यांसाठी एक चहावाला उगवतो. तसाच नळस्टॉप चौकात एका दुकानात मिळतो. तिथे रात्री नाईट मारून अभ्यास करणारे विद्यार्थी, आमच्या सारखे अवेळी हुंदडणारे भटके, रात्रीची उतरावयला आलेले तळीराम आणि गस्तीचे पोलीस सुद्धा इथे अमृततुल्य प्राशन करताना सापडतील. बहुतेक केदारेश्वर अमृततुल्य असे नाव आहे. असेच काही चहाचे गुत्ते टिळक रोड, स्वारगेट, युनिव्हर्सिटी रोड अशा भागांध्ये आहेत. चहाबरोबर काही तरी खायला हवेच. त्यासाठी ’मालपाणी’चे खुसखुशीत क्रीमरोल खरी मजा आणतात. रेशमी म्हणतात ना तसे हे क्रीमरोल आहेत. आधी फक्त सिटी प्राईडजवळ कुठेतरी मिळायचे, आता पुण्यात बऱ्याच जागी मिळतात. आमच्या फोटोग्राफर्स ऍट पुणेच्या बऱ्याच मीट्सना हाच खाऊ असतो. असेच चहाबरोबर खाण्यासाठी संतोष बेकरीचे पॅटीस. मस्त लेयर्समध्ये बेक केलेली भाजी चहाला लज्जत आणतात. सकाळे सकाळी पोटभरीचे खाणे होणे यासारखे सुख नाही. असाच एक फक्कड चहा चांदणी चौकातून खाली उतरताना कोपऱ्यावरच्या टपरीवर मिळतो.

पहाटेच्या वेळी युनिव्हर्सिटी चौकात एक अल्पोपाहार गृह उघडलेले असते. पोहे, उपमा, इडली असे वाफाळते पदार्थ पहाटे कुडकुडत खाण्यात एक वेगळीच मजा असते. जरा सोफिस्टिकेटेड जागा माणसांच्या वेळी (म्हणजे सकाळी आठनंतर) खाणार असाल तर ’वैशाली’ला ला पर्याय नाही. इडली-वडा, डोसा, सांबारमध्ये डुंबावे तर

वैशालीमध्येच. सुट्टीच्या दिवशी सकाळी तर अनेक आसपासच्या हेल्थ क्लबातली मंडळी पाठीला रॅकेट अडकावून इकडे गप्पा छाटत बसलेली असतात. वाडिया कॉलेजच्या मागे एक अण्णाची टपरी आहे. साऊथ इंडियन पदार्थ त्याच्यासारखे कुणीच बनवत नाही. कॉफी प्यावी ती मात्र ’गंधर्व’मध्येच. तिथल्या फिल्टर कॉफीसाठी तर मी कित्येकदा एका ठिकाणी खाऊन, वीस-वीस किलोमीटरची रपेट मारुन पोचलो आहे. उपवास असेल तर ’अप्पा’ची खिचडी काकडी अजिबातच चुकवू नका. पण आठवड्याच्या ठराविक दिवशीच ती मिळणार. इतर वेळी गेलात तर फक्त एक पक्का पुणेरी टोमणा पदरात पडेल. डेक्कन जिमखान्याचे कॅंटीन असणारे हे अप्पाचे हॉटेल सुनील गावसकरच्या ’सनी डेज’मध्ये उल्लेख केलेले आणि पुण्याचा क्रीडा इतिहासाचे साक्षीदार आहे. सध्य त्यांची ’चिरतरुण’ दुसरी पिढी पुण्याची क्षुधाशांती करत आहे. त्यांचे उसळपाव, इडली असे पदार्थ पण एकदम झकास. बरे हे हॉटेल केवढे? दीड-दोन फूट रुंदीचे ३-४ टेबलं आणि बसायला भिंतीला लागून असणारे सलग फळकुट. कळकटलेला पंखा आणि बाजूला लहानसा (खुराड्याएवढाच) भटारखाना. परतीच्या सुट्ट्या पैशांऐवजी काजू वडी मिळणार. जुन्या आणि नव्या पिढीतला एक समान दुवा म्हणजे ’गुडलक’. बन-मस्का, बन ऑमलेट आणि इराणी चहा- अजून काय पाहिजे नाष्ट्याला. असाच बन-मस्का कॅंपात डायमंडमध्ये मिळतो. पण ही इराणी हॉटेल्स प्रसिद्ध आहेत ती नॉन व्हेजसाठी, विशेषतः खीमा पाव साठी. लाकडी काच लावलेले काऊंटर, क्रीमरोलची बरणी, काचेतल्या कपाटात ठेवलेली बिस्कीटे, केक्स असा टिपिकल लूक असतो यांचा.

मिसळ खायला पुण्यात एसपी कॉलेजच्या समोर एक टपरी आहे. पेठेत बेडेकर मिसळ आणि ’काटा किर्र्र’ (हो, हे हॉटेलचे नाव आहे). अगदी फर्मास मिसळ पहिजे असेल तर सरळ चांदणी चौकातून पिरंगुट गाठा आणि घाट उतरल्याबरोबर उजवीकडे श्रीपाद हॉटेल आहे. राजगड, तोरणा मोहिमेवर असताना आमची स्वारी मिसळसाठी भोरच्या हॉटेल श्रीराममध्ये नाही विसावली तर नवलच. नाशिक हायवेवर राजगुरुनगरनंतर एक स्वामिनी नावाचे हॉटेल आहे. तिथेही छान मिसळ मिळते. केळकर म्युझियमजवळ बापटांची मिसळही नाकारण्याजोगी नाही. शिवाय सोबतीला खास जगद्विख्यात पुणेरी पाट्या पण असतात.

दुपारच्या जेवणाचा आणि आमचा संबंध ट्रेकदरम्यान कमीच येतो. आलाच तर वडापाव आणि चिवडा

यांवर काम भागते (घरुन डबा वगैरे कधीच बंद झालय. सुरवातीला कौतुकाने मिळायचा पण प्रत्येक वीकेंडलाच आम्ही उठून जायला लागल्यामुळे  "रोजचेच मढे, त्याला कोण रडे" अशी अवस्था आहे). तरी सिंहगडावर पिठलं भाकरी, भजी मिळते. आणि दुपारी सहसा व्हेज खात असल्यामुळे ते काय कुठेही खाल्ले तरी सारखेच लागते. पण तरीही वडापाव खावा तो सासवडला ’अस्मिता वडेवाले’ यांच्याकडे.

चटपटीत पदर्थांमध्ये पावभाजीचा नंबर पहिला. ती खावी ’मॉडर्न कॅफे’ला. तशी जंगली महाराज रोडच्या ’पांचाली’मध्ये पण बरी असते. पराठा खावा तो एफसीला ’चैतन्य’मध्ये. पाहिजे तो प्रकार मिळेल. पण त्यांनी नॉन व्हेज डिपार्टमेंट सुरु केल्यापासून माझे इतर पराठे बंदच झालेत.पराठ्यातले असेच नावाजलेले नाव म्हणजे ’शाहजी पराठा हाऊस’. तीन खाऊन दाखवले तर हा शाहजी तुमचा फोटो काढून ठेवतो, बिल घेत नाही आणि वर येण्याजाण्याचे रिक्षाचे पैसेही देतो.

मधल्या वेळचे खाणे म्हणजे बर्गर, पिझ्झा. बर्गरचे नाव काढल्यावर कॅंप आणि कोरेगाव पार्कातले बर्गर किंग कोण विसरेल? जंबो बर्गर आणि कोल्ड कॉफी घेतली की पुन्हा रात्री जेवायची इच्छाच राहणार नाही. असेच एक बर्गरचे पुणेरी व्हर्जन अलका चौकात मिळते. इथे सुप्रिया बेकरीत (लहान टपरी आहे) आले की संध्याकाळच्या भुकेची चिंता मिटते. कच्छी दाबेली साठी डेक्कनच्या कोपऱ्यावर एक दाबेलीवाल्याची गाडी आहे (देवकी नाव बहुतेक) तिथेच जावे. दाबेलीचे पाच-सहा प्रकार तर नक्की मिळतील. पौड रोडच्या दुर्गाचे नाव ऐकले नाही असा तरुण पुण्यात सापडणार नाही. अंडा भुर्जी आणि कोल्ड कॉफी पीत पीतच ही मुले कॉलेजमधून बाहेर पडली. अशीच अंडा भुर्जीची गाडी रात्री एसएनडीटीच्या मागे, कॅनॉल रोडवर लागते. पिझ्झा मी खातो ’स्मोकिन ज्यो’चा. अलीकडे ’ल पिझ्झेरिया’चे नाव पण बरेच ऐकलय.

रात्रीचे जेवण स्किप करायला निमित्त असावे कमला नेहरू पार्कासमोरच्या चिकन शोरमाचे (रोटीमध्ये रॅप केलेले चिकन आणि सॅलड). ’फासोज’चे रॅप पण ’सही’ असतात. रात्रीच्या जेवणाला जर मी बाहेर असेन तर

शक्यतो व्हेज खाण्याचे पाप मी करत नाही. मग त्यासाठी मग ’कावेरी’ची मटन-भाकरी (चार शाखा- वाघोली, खेड शिवापूर, चांदनी चौक आणि वाकड). ’पुरेपूर कोल्हापूर’ आणि आताच शोध लागलेले ’लवंगी मिरची’. लवंगी मिरची मध्ये आमचा मित्र सुहास तर आधीच सांगून ठेवतो, "आठ वाट्या पांढरा रस्सा पिल्याशिवाय उठायचेच नाही". पण मागच्या वेळी गोव्याला जाताना इस्लामपूर फाट्याला ’दत्त भुवन’मध्ये खाल्लेले मटण अजुनही आठवते. तसे परत कुठेच मिळाले नाही. चिकन साठी वाघोलीलाच एक ’पंजाब स्पाईस’ नावाचे हॉटेल आहे. तिथली तंदूरी कोंबडी फारच सही. मगरपट्ट्यातले ’रेड रोगन’ हॉटेल चिकन बिऱ्याणी मस्त द्यायचे, पण दुर्दैवाने बंद झाले ते. तिथेच ’डेक्कन हार्वेस्ट’ नावाचे हॉटेल आहे तिकडे चिकन चाट नावाचा अफलातून पदार्थ मिळतो. बाकी गुडलकमध्ये खीमा, चिकन-बेंगलोर स्टाईल मस्त मिळते. वाडिया कॉलेजजवळ ’ब्लू नाईल’चे बटर चिकन आणि बिर्याणी पण कधी चुकवू नये अशीच आहे. कॅंपमध्ये ’दोराबजीज’कडची दम बिर्याणीही छान असते. कबाब खावेत ’बार्बेक्यू नेशन’चे. थोडे महाग आहे पण तिथले अनलिमिटेड स्टार्टरवाले पॅकेज चुकवूच नये. चिकन, मटण, मासे, प्रॉन्स असे विविध प्रकारचे कबाब तुमच्या टेबलवरच बार्बेक्यु आणून मांडतात. हवे ते आणि हवे तेवढे खा. मग आम्ही काय सोडतो काय. वेटरला सांगून ठेवतो की व्हेज आणूच नको. दोन तास तर सहज जातात. एव्हाना आमचे तिकडे फोटो लावले असतील की हे लोक आले तर प्रवेश देऊ नये. खेकडे अतिशय सुंदर मिळतात तिथे. वर डेझर्टपण अनलिमिटेड. पैसे पुरेपूर वसूल. सी फूडसाठी कोकणाला पर्याय नाही. पण पुण्यात महेश लंच होम (कॅंप), मालवणी गजाली (बालेवाडी फाटा) यांनी थोडाफार कोकण आणलाय.

बाकी घासफूसवाल्यांसाठी जे-एम-रोडला बरीच हॉटेल्स आहेत. त्यातही शिवसागर, सुभद्रा, गंधर्व ही नावे जरा फेमस आहेत. थाळी साठी श्रेयस, दुर्वांकुर असे डायनिंग हॉल आहेतच, तसेच मंडईजवळ गोडसे उपहारगृहपण छान आहे.

डेझर्टसाठी विमाननगर आणि मगरपट्ट्यातले ’जलेबी जंक्शन’ आहेच. चितळे, काका हलवाई यांसारखे जगप्रसिद्ध मिठाईवीर आणि आइस्क्रीमसाठी नॅचरल्स, कावरे, गणू शिंदे, गुजर मस्तानी अशी अनेक नामांकित नावे आहेत.


आता किती वेळ वाचत बसणार आहात? डोळे झाकून एखादे ठिकाण निवडा आणि तिकडे पोचा. मी येतोच तुम्ही आमंत्रण दिलेत की... खा लेकहो... खा...!!!

या पोस्टमधील फोटो मी काढलेले नाहीत.

Read more...

दृष्टिकोन २००९: दुसरा आणि तिसरा दिवस

Monday, November 16, 2009

दृष्टिकोन २००९’चा दुसरा दिवस सुरु झाला तोच मुळी धुवांधार पावसाने. त्यामुळे थोडी निराशा येऊ लागली होती. पण लवकरच आकाश मोकळे झाले आणि मी हॉलकडे कूच केले. आजचा दिवस फार वेगळा होता. बऱ्याच वर्तमानपत्रांनी प्रदर्शनाच्या बातम्या झळकावल्या होत्या. त्यामुळे आज उत्साह वाढला होता. आजवरच्या फोटोग्राफर्स॒पुणेच्या एकाही प्रदर्शनात झाले नाही अशी गोष्ट म्हणजे अनेक वर्कशॉप्स अरेंज केले होते. फोटोएडिटिंग सॉफ्टवेअर्स, टूल्स यावर ऋषी आणि सुहासने प्रकाश टाकला. दुपारी मस्तपैकी बिर्याणी चापली. आणि नंतर खूपच सुस्तावलो. दुपारी विशालचे वाइल्डलाईफ फोटोग्राफीचे एक आणि संध्याकाळी अन्वयचे मॅक्रो फोटोग्राफीचे इंटरेस्टिंग सेशन झाले. पब्लिक जाम खुश. शनिवारचे संध्याकाळ असल्यामुळे बरीच गर्दी झाली होती. एकेक फोटो विकत घेण्यासाठीही चौकशी केली जात होती. आज एक गमतीशीर गोष्ट घडली ती म्हणजे, आमचा मंगेश आज येणार होता. मी आणि सुहास त्याच्याशी अनेकदा ऑनलाईन बोललो असलो तरी प्रत्यक्ष कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे तो आला आणि आमच्या समोरुन चार वेळा गेला तरी आम्हांला समजले नाही. मी त्याला फोन केला तेव्हा मला समजले हा शेजारी बाहेर उभा असलेलाच मंगू आहे. म्हणजे आमचा विश्वासच बसत नव्हता की मंगेश एवढासा आहे (तसा मीही काही फार मोठा नाही). सुहासची हाय-हॅलो सोडून पहिली प्रतिक्रिया होती ’इइइइइ.... तु मंगेश आहेस? मग तु L साइजचा टीशर्ट का घेतलास?’

त्या रात्री पुन्हा एकदा भूषण नामक जादूची बैठक झाली.


तिसऱ्या दिवशी पाऊस उघडला होता. स्वच्छ वातावरण होते. सकाळे हॉलच्या वरच्या मजल्यावर कुठल्यातरी नेटवर्क मार्केटिंगवाल्या कंपनीचे (बकरे कापण्याचे) सेशन होते. दोनेकशे सुटाबुटात लोक हलाल व्हायला आलेले दिसत होते. आजचा दिवस मंगूच्या ऍडव्हान्स्ड फोटोशॉपच्या वर्क्शॉपने गाजवला. नंतर सुनील कपाडियांचे प्रिंटिंगवर सेशन झाले. हॉलमध्ये बऱ्याच मेंबर्सनी गर्दी केली होती. त्यामुळे एक आगळे संमेलन भरले होते. कौशल्याची देवाणघेवाण होत होती. विविध अनुभव आणि तंत्रे शेअर केली गेली. अखेर आमच्या प्रदर्शनाचा हेतू हाच तर असतो. संध्याकाळी पुन्हा पाऊसधारा बरसल्या. तशातच आम्ही बाहेर जाऊन चहा मारून (होय, मारूनच, पिऊन नाही) आलो. पाऊस असूनही अनपेक्षितपणे गर्दी वाढली होती. एकेका फोटोवर 'SOLD' चे टॅग लागत होते. आअठ वाजले तसे आम्हाला आवरा-आवरीचे वेध लागले. मनात नव्हते पण आवरावे तर लागणार होतेच.

रात्री ज्याच्यात्याच्या फ्रेम्स दिल्या. जे निष्कालजी मेंबर्स आले नव्हते, त्यांच्या फ्रेम्स आमच्यापैकीच काही लोकांच्या घरी ठेवल्या. ग्रुप फोटो झाला. भूषणने मैफिल जमवली.

मैं कोई ऐसा गीत गाऊ...



रात कली एक खाब में आयी...




शारद सुंदर चंदेरी राती...




अजीब दास्तान है ये...



खूप गाणी ऐकली. तरी मन भरत नव्हते.

मे महिन्यापासून पाहिलेले एक स्वप्न पूर्ण झाले होते. आता जाग आली होती. ऑफिसातून धावपळ करत मीटला पोहोचणे, मग कॉफीचे घुटके घेत चर्चा झडणे, शनिवारी सकाळी ’वैशाली’ मध्ये वडा सांबार आणि डोसा हादडणे, बजेट तयार करणे, शेड्युल फिक्स करणे, रोज मेलबॉक्स एक्झिबिशन इमेल्सने फुल असणे, मग रात्री जागून केलेल्या चर्चा, चॅटवर होअणारे डिस्कशन, भटकंतीला ब्रेक देऊन केलेल्या मीट्स, किरणच्या घरी शेवटच्या आठवड्यात केलेल्या प्रिंट्स, फ्रेमवाल्याच्या मागे केलेली धावपळ, टीशर्टच्या डिझाइनवरुन होणारे मतभेद, व्हेंडर्सचा फॉलोअप घेणे, एकमेकांवर केले जाणारे जोक्स, एकत्र खाल्लेले पिझ्झा, टपरीवर मारले जाणारे चहा, एकेमेकांना दिली जाणारी टोपणनावे (पप्पा गुप्ते, सुहास तात्या, स्वाती आत्या, हर्क्युलस वैभव, जादूगार भूषण.... यातले उद्यापासून काहीच नसणार का?






खरंच... साथ रहे ना रहे हम... याद आएंगे ये पल...

Read more...

दृष्टिकोन २००९: पहिला दिवस.

Friday, November 13, 2009

शेवटी 'दि डे' म्हणतात तो दिवस उगवला. प्रदर्शन उद्यावर आलंय आणि मी ऑफिसमध्ये कीबोर्ड खाजवतोय. तिकडून फोनवर फोन चाललेत. पत्रकार, मिडिया, फोटोग्राफर्स॒@पुणेची कोअर टीम एकेकाचे फोन चालू आहेत. रेडिओ सिटीवर आमच्या जाहिराती सुरु झाल्यात. चैतन्यने हॉलची वाईट स्थिती ऐकवून टेन्शन दिलंय. खरं तर आज माझे पण कामात लक्ष लागत नाहीये. कसे लागणार? गेले ४ महिन्यांपासून सुरु केलेली मेहनत उद्या खरे रंग दाखवणार. गेला आठवडाभर तर रोज गाडी १००किमी धावत होती. सुहास, किरण, मी, स्वाती, सौमित्र, अमित, चैतन्य, ऋषी असे सगळे किरणच्या घरी प्रिंट्स कढत होतो. किरणची बायको राधिका आणि पिटुकला अर्जुन यांनी आम्हांला कसे सहन केले ते त्यांनाच माहीत.

पाणी अगदी नाकातोंडाशी आल्यावर पेपर शोधण्यासाठी केलेली धावपळ आणि कुरियरचे पुण्यातले सुहासने पालथे घातलेले गोडाऊन. अजुनही सगळे आठवतंय. जसा लॉट प्रिंट होतील तसा फ्रेमिंगला टाकतोय. आता सगळ्याचे फळ उद्या दिसू लागणार. ऑफिसमधून कलटी मारुन आठ वाजता मी हॉलवर पोचलो. बरीच मंडळी जमली होती. फ्रेमवाल्याने तीन फ्रेमच घोळ घातलाय. लास्ट मिनिट त्या रि-प्रिंट मारुन उद्या सकाळी लवकर फ्रेम करुन आणायच्या आहेत. भूक लागली होती. ध्रुवने आणलेले वडापावने आधार दिला. अभिरने पण खास क्रीमरोल आणले होते. हॉल स्वच्छ करुन फ्रेम्स टांगायचे काम सुरु केले. रात्री दोन वाजता घरी पोचलो.


सकाळी नवीन फोटोग्राफर्स॒@पुणेचा स्पेशल टीशर्ट घालून हॉलवर पोचलो. सकाळीच कांचन(मोगरा फुलला)चा शुभेच्छा फोन झाला. बरं वाटलं. विद्या महामंडळच्या मूकबधिर मुलांच्या आणि प्रसिद्ध फोटोग्राफर सतीश पाकणीकरांच्या हस्ते उद़घाटन झाले. शब्दांद्वारे व्यक्त करता न येणारा त्या मुलांचा आनंद त्यांच्या डोळ्यांतून आम्हांला जाणवत होता. दुपार कशी झाली ते समजलेही नाही. काही पत्रकार पण येऊन गेले. आता भूक लागली होती तरीही खायला कुणी आणले नव्हते. दरम्यान अजिंक्यने एवढी झाडे आणून लावली की झाडांचेच प्रदर्शन वाटू लागले होते. त्या कुंड्या उचलून जास्तच भूक लागली. साईड बाय साईड आम्ही हॉलमध्ये फोटोची माहिती देणारे कागद लावून घेतले.

संध्याकाळी गर्दी हळूहळू जमू लागली. पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद. रेडिओच्या जाहिरातीचा परिणाम असावा. काही फोटो विकत घेण्यासाठीही प्रेक्षक रस दाखवू लागले. पटकन एक ताजा ताजा फोटो अपलोड केला आणि दिवस संपायची वाट पाहत बसलो. मध्ये मध्ये काही तरी टाईमपास म्हणून चॉकलेटचे हप्ते चालू होते. स्वातीतर जो येईल त्याला चॉकलेट खऊ घालत होती. सुहासचा रेडिओवर लाईव्ह फीड झाला.



एवढा एक्साईट झाला होता की उड्या मारायचाच बाकी होता. जशी जशी वेळ संपत आली तशी आम्हांला घरी जाऊन गादीवर अंग टाकायचे वेध लागले.

ऑन डिमांड भूषणने घरुन गिटार आणले आणि आमच्या दिलाच्या अशा काही तारा छेडल्या की अंगावर रोमांच उभे राहिले. दिवसाचा शेवट कसला सुंदर केला त्याने... अजूनही कानात तो झंकार घुमतोय.

सुरुवात झाली एका इंग्लिश गाण्याने...




भंवरे का गुंजन...




डूबा डूबा रहता हूँ...



कुछ तो लोग कहेंगे...



ओ सनम.. मोहब्बत की कसम...




ये शाम मस्तानी... मदहोश किये जाय...



खरंच ये शाम मस्तानी... मदहोश किये जाय...

ये तो ट्रेलर है मेरे दोस्तों... पिक्चर अभी बाकी है...!!!

Read more...

Drushtikon-09 Radio Bytes.

Wednesday, November 11, 2009

This time, P@P tried for more publicity for the exhibition. Couple of mentions are already in the print media. These bytes are the part of radio advertisement to be aired on Radio City @ 91.1 MHz.




Read more...

Drushtikon-2009

Friday, November 6, 2009

Photographers@Pune proudly invites you to

 DRUSHTIKON 2009

The world we live in is made up of a myriad of places, events and colors… from the serene and picturesque mountains... to the raging seas. All made of different colors and different shades. The moment you see such immaculate sights, be it natural or artificial, you always want to capture them forever.
Over the past couple of years, we have been capturing countless such spectacular sights too, but with a slight difference. The difference is in seeing the world through our lens…
A different world through our Drushtikon ...

For this rich experience visit
New Art Gallery, Ghole Road
from 13th to 15th November 2009
between 10.00 am to 9.00 pm

Read more...

सगळेच काळजीवाहू.

Wednesday, November 4, 2009

सर्व काही काल्पनिक. वास्तवाशी संबंध (असेल तर) निव्वळ योगायोग समजावा.

स्टार माझा वरचा स्पेशल रिपोर्ट पाहिला. खेद वाटला. सगळंच कसं काळजीवाहू चालू आहे.

मतदार राजाचा अनादर करुन आघाडीचे जवान (?) ’अर्थ’पूर्ण मंत्रीपदांसाठी अडून बसलेत. स्वतःच्या गोटात आपल्याच पक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधणारे लोक होते. मग त्यासाठी कधी दिल्लीवारी, कधी बैठकीतून मधूनच उठून जाणे, समर्थकांची गर्दी जमवणे, पक्षश्रेष्ठींशी जवळीक साधणे अशा हरकती चालायच्या. आता तेच लोक एकमेकांच्या शेजारी शेजारी बसून हसत हसत समोरच्या पक्षावर कुरघोडीचा प्रयत्न करताना दिसताहेत. चॅनेलवाले पण तीच ती दॄश्ये दाखवतात. हसने, एकमेकांना पेढे भरवणे, माइकला हात घालून काही तरी बोलायचे आहे असे दाखवणं. अहो बास झाली ही साठमारी. जहाजाचा कप्तान किती दिवस असा काळजीवाहू ठेवणार आहात. आणि सत्तेच्या स्पर्धेत कप्तान तरी किती काळजी वाहणार? त्याला स्वतःच्या इच्छा आकांक्षा आहेत की नाहीत. त्याला पण मलई पाहिजे. त्यासाठी दिल्ली वाऱ्या त्यालाही चुकल्या नाहीत!

Read more...