दिवाळी: आऊसाहेबांची आणि थोरल्या महाराजांची
ओसरीवर आऊसाहेब जपमाळेचे मणी सारत आजूबाजूला चाललेली लगबग निरखीत होत्या. जपमाळेचा एक वेढा संपल्यावर ती कपाळाशी ‘जगदंब.. जगदंब’ म्हणताना सकाळी शिवरायांना, शंभूराजांना आणि राजारामाला अभ्यंग स्नानाच्या वेळी लावलेल्या उटण्याचा सुवास अजूनही हातावर दरवळत होता. नकळत त्यांचे मन हळूच भूतकाळात रमून गेले. शिवरायांच्या बालपणी लालमहालाच्या अंगणात त्यांनी सवंगड्यासोबत केलेले किल्ले, ते करताना चिखलाने माखलेले हात, मग अंगरखा खराब केला म्हणून आपण त्याला केलेली ओरड, मग आपला राग घालवण्यासाठी शिवबाने त्याच चिखलाच्या हातांनी कमरेला मारलेली मिठी, आणि त्या मिठीसरशी लोण्यासारखा वितळून गेलेला राग. त्यांचे त्यांनाच हसू आले. चेहर्यावर झळकलेले ते स्मित राणीवशाच्या झरोक्यातून पुतळाबाईसाहेबांनी अचूक टिपले. आतमध्ये त्यांनी काशीबाईंना ते पहायला खुणावले. काशीबाईंची नजर जाण्याच्या आतच थोरल्या महाराजसाहेबांच्या आठवणीने आऊसाहेबांच्या काळजात एक यातनेची लकेर उमटली आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या. प्रसंग ओळखून तो क्षण सावरण्यासाठी पुतळाबाईसाहेब ओसरीवर आल्या आणि डोईचा पदर सावरत दासीमंडळाला उद्देशून म्हणाल्या... "चला गं, झाली का पूजेची तयारी?" त्या आवाजासरशी जिजाऊंनी स्वतःला सावरले आणि पदराने डोळे टिपून भानावर आल्या. पुतळाबाईंची ही हुशारी ओळखून असलेल्या सोयराबाईंनी नाकातली नथ नीट करत मंद स्मित केले.
वाड्यावर दिमतीला असणार्या बहुतेक दासी आणि सेवक मंडळाला जिजाऊंनी दिवाळीला बळेच घरी धाडले होते. त्यांचाही आपल्या लाडक्या जिजाऊंना सोडून महाराजसाहेबांच्या नजरेआड पाय निघत नव्हता. पण आऊसाहेब ऐकतील तर शपथ. सणासुदीला प्रत्येकाने आपल्या लेकराबाळांसोबत कुटुंबाबरोबर असावे असा त्यांचा दरवर्षीचा शिरस्ता होता. म्हणूनच त्यांनी जातीने लक्ष घालून दिवाळीची बिदागी देऊन आपापल्या घरी धाडले होते. जे काही शिवरायांनी आधार दिलेले निराधार सेवक आणि दासी होते त्यांना आप्तांची उणीव भासू नये म्हणून वाड्यावरच त्यांची नवीन कपडे, मिठाई अशी बडदास्त ठेवली होती. सेवकांनाही संकोचल्यासारखे होत होते. म्हणूनच की काय वाड्यावर सेवेशी ते जातीने हजर होते.
दासी पणत्यांचे तबक घेऊन इकडे-तिकडे करीत होत्या. पूजेसाठी लागणारी फुले सकाळीच माळीकाकांनी आणून दिली होती. जुईच्या फुलांचा मंद दरवळ बाहेर अगदी ओसरीपर्यंत आला होता. ब्राह्मणवाड्यातून गुरुजी आणायला पालखी रवाना केली होती. दासीमंडळ तेलाच्या पणत्या सर्वत्र पोचवण्यात मग्न होत्या. इकडे सदरेवर गावोगावच्या सरदारांनी पाठवलेले नजराणे शिवरायांच्या हस्तस्पर्शाने पावन होण्यासाठी निरोपाच्या दूतांसह रांग लावून होते. त्यांनाही आज जाणता राजा पहायला मिळणार म्हणून आभाळ ठेंगणे झाले होते. येतानाच त्यांनी गजांतलक्ष्मी ऐश्वर्य काय असते याचा प्रत्यय घेतला होता. अगदी देवडीवरच्या पहारेकर्यापासून पालख्यांच्या भोयांपर्यंत सगळे भरजरी रेशमी झब्बे घालून नटले होते. महाद्वारावर फुलांची रांगोळी काढली होती. पुष्करणीच्या पाण्यावर तरंगणारी रांगोळी पाहून त्यांना ते पाणी आहे हे सांगूनही खरे वाटत नव्हते. सर्वत्र पणत्यांचा मंद सोनेरी प्रकाश वाड्याला न्हाऊ घालत होता. गजशाळेतले हत्ती सोन्याच्या झुली आणि अंबारी कसून तयार होते. माहून सोनेरी अंकुश सावरुन स्वार झाले होते. निशाणाचा घोडा पाठावर भगवे निशाण घेऊन अश्वशाळेच्या भुईवर खूर आपटत होता. तोफांना वाती खोचून गोलंदाज सज्ज होते.
शिवरायांच्या दालनात त्यांचा विश्वासू सेवक मदारी मेहतर महाराजांचा जिरेटोप तबकात ठेवून अदबीने उभा होता. आपण आजवर असे काय पुण्य केले असेल तेव्हा आपण राजांच्या खाजगीत दिमतीस आहोत असाच विचार केव्हापासून त्याच्या मनात फेर धरुन नाचत होता. राजे दर्पणात केस सावरुन समोर आले तरीही त्याचे लक्ष नव्हते. त्यांनी जिरेटोप उचलला आणि डोईवर चढवला. तेव्हा कुठे मदारी भानावर आला. टोप नीट करुन ‘बसलाय का’ अशा प्रश्नार्थक नजरेने राजांनी त्याच्याकडे पाहिले. ‘लई झ्याक’ असे म्हणून त्याने होकार भरला आणि राजांची एकवार ‘नजर उतरवावी’ असे त्याला वाटून गेले. नित्यपूजेच्या स्फटिकाच्या शिवलिंगाला नमस्कार करुन राजे हिरोजीच्या हातातून समशेर घेत ओसरीवर आले. बाहेरचे सेवक जरासे चपापले, पण तेजाने लखलखती स्मितहास्य करणारी ती गोरीपान मूर्ती पाहून आदराने मुजरे झडले. जिजाऊंनी शेवटी मीठ-मोहर्या घेऊन राजांची दृष्ट काढलीच. तसाच तो हात शेजारी असलेल्या शंभूराजांवरुनही फिरवला. ते रुबाबदार रुपडे पाहून राणीवशाच्या झरोक्याआड बांगड्या किणकिणल्या, कित्येक गाल गुलाबी लाजरे झाले. राजांच्या नजरेतून आणि कानांतून ते सुटले नाहीच. पण त्याकडे दुर्लक्ष करुन ते सदरेवर आले. मागोमाग कुटुंबकबिला. सदरेवर मुजरे झडले. राजांनी कारकुनाला त्या सगळ्या निरोप्यांची योग्य ती राहण्याची व्यवस्था करण्यास बजावले. सायंकाळच्या पंगतीला आमच्याबरोबर बसा असा प्रेमळ इशारा दिला. लक्ष्मीपूजनाची मुहुर्ताची घटिका समीप आली असा सांगावा कुबेरखान्यातून आला तसा जिजाऊ, राजे, शंभूबाळ, लहानगा राजाराम आणि सारा राणीवसा तिकडे निघाले.
स्वराज्याचे सारे वैभव कुबेरखान्यात व्यवस्थित मांडून ठेवले होते. रत्नराशी, दाग-दागिने, सोने, जड-जवाहिर यांनी भरलेले मोठमोठाले पेटारे, त्यावर भक्कम कुलुपं, त्यावर आतमध्ये असलेल्या मुद्देमालाचा अचूक तपशील लिहिलेला तक्ता, हिशेबाची बाडं, कारकुनांच्या बैठकी, कलम-दौती सगळे कसे फुलांनी सजवून ठेवले होते. त्या फुलांचा मंद दरवळ कुबेरखान्याचे वातावरण प्रसन्न करत होता. मंत्रघोषात लक्ष्मीपूजन सुरु जाहले. गुरुजींनी थोडेसे गोमूत्र सर्वांवर शिंपडले. त्याचे महत्त्व न कळल्याने राजारामाने थोडेसे त्रासिकपणे अंग चोरले, पण सोयराबाईंनी त्याला डोळ्यांनीच समजावले. राजे हात जोडून लक्ष्मीच्या रुपेरी मूर्तीसमोर डोळे मिटून उभे राहिले. विचार करुन लागले...
"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...!!!"
मागे मंत्रघोष चालूच होता. पूजा आटोपल्यावर सर्वांना तीर्थ दिले. राजांनी वाड्याच्या चौकातून मागच्या आठवड्यातच फिरंगी वकिलाने ्नजर केलेल्या दुनळीतून बार काढला आणि तीच पडत्या फळाची आज्ञा मानून गोलंदाजांनी बुरुजांवरुन चौफेर तोफा डागल्या तशी राजांचे लक्ष्मीपूजन झाले याची वर्दी पंचक्रोशीत पोचली. निशाणाचा अश्व गडावर फेरी मारुन आला. हत्तीवरुन साखर वाटण्यात आली. अवघा गड पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. जणू आकाशीचे तारेच धरणीवर आले आहेत. भेटीगाठी चालू झाल्या. राणीवशाचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडले. गडावरल्या सरदारांनी एकमेकांना आलिंगने देत दिवाळी साजरी केली. फराळाची ताटे उंबर्यातून आतबाहेर करु लागली. राजे सदरेवर आले. नजराण्यांचा स्वीकार केला गेला. दूरदेशीच्या स्वराज्याच्या शिलेदारांची, रयतेची ख्यालीखुशाली विचारली गेली. फेरनजराणे रवाना केले गेले. या सार्या गोंधळात रात्रीच्या पंगतीची वेळ झाली. पाटचौरंग मांडले गेले, रांगोळ्या पडल्या, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला. उंची अत्तराचा फाया दिला गेला. छान गप्पाटप्पा होत, हसत खेळत पंगत बसली. पंचपक्वान्नांचा थाट होता. अगदी निरोप घेऊन आलेले निरोपे दूतही राजांच्या पंगतीला बसलेले पाहून जिजाऊंना वाटले हाच खरा रयतेचा राजा... जाणता राजा. जेवणानंतर निरोपाचे सुवासिक विडे दिले गेले. तृप्त मनाने मंडळी मुक्कामी निघाली.
दिवसभराच्या दगदगीने शिणलेल्या राजांनी समशेर तबकात ठेवली. जिरेटोप आणि भरजरी वस्त्रे उतरवून बिछान्याला पाठ टेकवली आणि डोळे मिटले. थोडासा डोळा लागला तेव्हा अचानक ऐकू आलं, ‘इकडच्या स्वारीचं लक्षच नाही आमच्याकडं’. राजे चपापून उठून पाहू लागले. ते एक स्वप्न होते. सईबाईंचे स्वप्न. स्वप्नातही सईबाईंची आठवण पाठ सोडत नव्हती. एक तीव्र उसासा टाकून राजे खिडकीशी आले. मदारी जागा झाला... थंडगार वार्याची झुळुक आली तशी त्याने राजांवर शाल पांघरली. राजांनी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवून सांगितले "जा, झोप तू". अजूनही पणत्या तेवत होत्या. दूरवर स्वराज्यात दिवाळी सुरु होती... वैभवशाली दिवाळी. मराठी दौलत लखलखत होती. राजे पुन्हा विचार करु लागले...
वाड्यावर दिमतीला असणार्या बहुतेक दासी आणि सेवक मंडळाला जिजाऊंनी दिवाळीला बळेच घरी धाडले होते. त्यांचाही आपल्या लाडक्या जिजाऊंना सोडून महाराजसाहेबांच्या नजरेआड पाय निघत नव्हता. पण आऊसाहेब ऐकतील तर शपथ. सणासुदीला प्रत्येकाने आपल्या लेकराबाळांसोबत कुटुंबाबरोबर असावे असा त्यांचा दरवर्षीचा शिरस्ता होता. म्हणूनच त्यांनी जातीने लक्ष घालून दिवाळीची बिदागी देऊन आपापल्या घरी धाडले होते. जे काही शिवरायांनी आधार दिलेले निराधार सेवक आणि दासी होते त्यांना आप्तांची उणीव भासू नये म्हणून वाड्यावरच त्यांची नवीन कपडे, मिठाई अशी बडदास्त ठेवली होती. सेवकांनाही संकोचल्यासारखे होत होते. म्हणूनच की काय वाड्यावर सेवेशी ते जातीने हजर होते.

शिवरायांच्या दालनात त्यांचा विश्वासू सेवक मदारी मेहतर महाराजांचा जिरेटोप तबकात ठेवून अदबीने उभा होता. आपण आजवर असे काय पुण्य केले असेल तेव्हा आपण राजांच्या खाजगीत दिमतीस आहोत असाच विचार केव्हापासून त्याच्या मनात फेर धरुन नाचत होता. राजे दर्पणात केस सावरुन समोर आले तरीही त्याचे लक्ष नव्हते. त्यांनी जिरेटोप उचलला आणि डोईवर चढवला. तेव्हा कुठे मदारी भानावर आला. टोप नीट करुन ‘बसलाय का’ अशा प्रश्नार्थक नजरेने राजांनी त्याच्याकडे पाहिले. ‘लई झ्याक’ असे म्हणून त्याने होकार भरला आणि राजांची एकवार ‘नजर उतरवावी’ असे त्याला वाटून गेले. नित्यपूजेच्या स्फटिकाच्या शिवलिंगाला नमस्कार करुन राजे हिरोजीच्या हातातून समशेर घेत ओसरीवर आले. बाहेरचे सेवक जरासे चपापले, पण तेजाने लखलखती स्मितहास्य करणारी ती गोरीपान मूर्ती पाहून आदराने मुजरे झडले. जिजाऊंनी शेवटी मीठ-मोहर्या घेऊन राजांची दृष्ट काढलीच. तसाच तो हात शेजारी असलेल्या शंभूराजांवरुनही फिरवला. ते रुबाबदार रुपडे पाहून राणीवशाच्या झरोक्याआड बांगड्या किणकिणल्या, कित्येक गाल गुलाबी लाजरे झाले. राजांच्या नजरेतून आणि कानांतून ते सुटले नाहीच. पण त्याकडे दुर्लक्ष करुन ते सदरेवर आले. मागोमाग कुटुंबकबिला. सदरेवर मुजरे झडले. राजांनी कारकुनाला त्या सगळ्या निरोप्यांची योग्य ती राहण्याची व्यवस्था करण्यास बजावले. सायंकाळच्या पंगतीला आमच्याबरोबर बसा असा प्रेमळ इशारा दिला. लक्ष्मीपूजनाची मुहुर्ताची घटिका समीप आली असा सांगावा कुबेरखान्यातून आला तसा जिजाऊ, राजे, शंभूबाळ, लहानगा राजाराम आणि सारा राणीवसा तिकडे निघाले.
स्वराज्याचे सारे वैभव कुबेरखान्यात व्यवस्थित मांडून ठेवले होते. रत्नराशी, दाग-दागिने, सोने, जड-जवाहिर यांनी भरलेले मोठमोठाले पेटारे, त्यावर भक्कम कुलुपं, त्यावर आतमध्ये असलेल्या मुद्देमालाचा अचूक तपशील लिहिलेला तक्ता, हिशेबाची बाडं, कारकुनांच्या बैठकी, कलम-दौती सगळे कसे फुलांनी सजवून ठेवले होते. त्या फुलांचा मंद दरवळ कुबेरखान्याचे वातावरण प्रसन्न करत होता. मंत्रघोषात लक्ष्मीपूजन सुरु जाहले. गुरुजींनी थोडेसे गोमूत्र सर्वांवर शिंपडले. त्याचे महत्त्व न कळल्याने राजारामाने थोडेसे त्रासिकपणे अंग चोरले, पण सोयराबाईंनी त्याला डोळ्यांनीच समजावले. राजे हात जोडून लक्ष्मीच्या रुपेरी मूर्तीसमोर डोळे मिटून उभे राहिले. विचार करुन लागले...
"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...!!!"
मागे मंत्रघोष चालूच होता. पूजा आटोपल्यावर सर्वांना तीर्थ दिले. राजांनी वाड्याच्या चौकातून मागच्या आठवड्यातच फिरंगी वकिलाने ्नजर केलेल्या दुनळीतून बार काढला आणि तीच पडत्या फळाची आज्ञा मानून गोलंदाजांनी बुरुजांवरुन चौफेर तोफा डागल्या तशी राजांचे लक्ष्मीपूजन झाले याची वर्दी पंचक्रोशीत पोचली. निशाणाचा अश्व गडावर फेरी मारुन आला. हत्तीवरुन साखर वाटण्यात आली. अवघा गड पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. जणू आकाशीचे तारेच धरणीवर आले आहेत. भेटीगाठी चालू झाल्या. राणीवशाचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडले. गडावरल्या सरदारांनी एकमेकांना आलिंगने देत दिवाळी साजरी केली. फराळाची ताटे उंबर्यातून आतबाहेर करु लागली. राजे सदरेवर आले. नजराण्यांचा स्वीकार केला गेला. दूरदेशीच्या स्वराज्याच्या शिलेदारांची, रयतेची ख्यालीखुशाली विचारली गेली. फेरनजराणे रवाना केले गेले. या सार्या गोंधळात रात्रीच्या पंगतीची वेळ झाली. पाटचौरंग मांडले गेले, रांगोळ्या पडल्या, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला. उंची अत्तराचा फाया दिला गेला. छान गप्पाटप्पा होत, हसत खेळत पंगत बसली. पंचपक्वान्नांचा थाट होता. अगदी निरोप घेऊन आलेले निरोपे दूतही राजांच्या पंगतीला बसलेले पाहून जिजाऊंना वाटले हाच खरा रयतेचा राजा... जाणता राजा. जेवणानंतर निरोपाचे सुवासिक विडे दिले गेले. तृप्त मनाने मंडळी मुक्कामी निघाली.

"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...!!!
कुठलाही संदर्भ न घेता लिहिलेली ही पोस्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. सहज बसलो असता थोरल्या महाराजांची दिवाळी कशी असेल असा एक विचार मनात चमकला. आणि जे जे काही सुचले ते लिहून काढले. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असू शकतात.
सुंदर झालंय.. डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं.. शिवराय अगदी अशीच दिवाळी साजरी करत असतील नक्की !!
ReplyDeleteदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
पंकज.. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असू शकतात.... अरे तू अनावधानाने लिहिलेले संदर्भ बघता ही दिवाळी १६७३ ची आहे असे आपण नक्की धरू शकतो... :) प्रतापरावांचा मृत्यू आणि काशीबाईंचा मृत्यू याच्या मधली दिवाळी... :) शिवाय फिरंगी वकील, राजांचा १६७३ असणारा दरारा, राज्या भिशेका पूर्वी निर्माण झालेले वैभव हे सर्व पोस्ट मध्ये एकदम चपखल बसताय...
ReplyDeleteकला आहे मी... ह्यात पण दिवस आणि तारखा जोडतोय... कसले मस्त लिहिले आहेस तू... अस वाटतंय की मी १६७३ मध्ये पोचलोय आणि रायगडाच्या एका कोनाड्यात उभा राहून हे सर्व बघतोय... :)
आता रायगडाला कधी जायचे रे!!! आठवण करून दिलीस... ह्यावेळची दिवाळी हुकली... :(
पुन्हा एकदा मानला तुला... :) मस्तच मस्तच मस्तच... :)
अरे.... खुप सुंदर, खुप सुंदर... सुरेख नजारा उभा केलास!!! अप्रतिम!!!
ReplyDeleteराजांच्या नावानं .. काय सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची....!सुरेख.. अगदी राजांच्या युगाची सफर झाली!
ReplyDeleteमनोमनी: राजांनी पुन्हा यावे हीच ईच्छा.. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!
अरे तू तर समोर चित्रच उभे केलेस. खूप छान झाली आहे पोस्ट. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पंकज दादा ....
ReplyDeleteसुंदर, अशीच असेल शिवाजी महाराजांची दिवाळी! आमची दिवाळीची सुरुवात छान करून दिलीस! धन्यवाद. :)
ReplyDeleteअप्रतिम !
ReplyDeleteदिवसाची आणि दिवाळीची मस्त सुरूवात झाली आहे.
वर्णन आणि त्यातील बारकावे लाजवाब आहेत. खरच शिवकालात गेल्याचा भास झाला आणि आपण एक मावळा म्हणून सगळं अनुभवत आहे असे वाटले. अप्रतिम लेखनकौशल्य !
दिवाळीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा !
हर हर महादेव ! जय शिवाजी ! जय भवानी !
Dipak, agadi hech mhanavese watle mala.
ReplyDeleteMast zali aahe post
Divalichya shubhechha
Aniket
सुंदर, अप्रतिम ! ! मित्रा, काय लिहिलयंस यार !! डोळे पाणावले !!
ReplyDeleteअभिनंदन, त्रिवार अभिनंदन !!
अस वाटतंय की मी १६७३ मध्ये पोचलोय आणि रायगडाच्या एका कोनाड्यात उभा राहून हे सर्व बघतोय... :) ++++
Mastach :)
ReplyDeleteअगदी एखादा नाट्यप्रयोग वाचवा तसं चित्रवत डोळ्यासमोर उभ केलस बघ....
ReplyDeleteदिवाळीच्या शुभेच्छा...
एकदम मस्त...
ReplyDeleteसगळा देखावा डोळ्यासमोर उभा राहीला होता...
मुजरा राजांना....
मित्रा अक्खा पोस्ट वाचला आणि नंतर वाचला कि तू हे विचार करून स्वताच्या मनाने लिहिला आहेस, हे खरच विचार करण्याच्या पलीकडले आहे, तू तर एक अप्रतिम जिवंत चित्र उभं केलं आहेस
ReplyDeleteवाह यार..शब्द नाही रे सुचत..
ReplyDeleteखूप खूप छान
salya
ReplyDeletekal bolayala kay zalele
jabari ..................................
मान्यवर,
ReplyDeleteतुमच्या लेखणीचे तेज आता दिशा, काल, व्यक्तीसापेक्ष न राह्ता सर्वव्यापी झाले आहे. This is no doubt your one of the best post on this blog...काय लिहीलं आहेस मित्रा..... तू शिवचरीत्रावर खुप प्रासादिक लिहू शकतोस यार.......अप्रतिम. प्रत्येकाने वाचावी अशीच पोस्ट !!
Sir, Agadi lavun mujara karat aahe tumhala, Swikar kara .. Dolyasamor sagle drushya ubhe rahile ekdam jase chya tase ..
ReplyDeleteपंकज, आज सकाळी अभ्यंग, फराळ झाल्यावर 'पुढे काय ?' असा प्रश्न असताना हीपोस्ट वाचायला मिळाली, जबरदस्त् ! हीच पोस्ट पुढे वाढवून कादंबरी व्हावी .. हीच दिवाळीची शुभेच्छा !! :)
ReplyDeleteकाय बोलावं? एक एक वाक्य वाचताना एक एक चित्र डोळ्यासमोर उभं रहात होतं! एखादं आर्टवर्क बनवावं असा विचार आला! तुझ्या लिखाणाला तोड नाहिये!
ReplyDeleteमी एवढाच म्हणतो की मागल्या जन्मी तू शिवरायांचा मावळा होतास !!!
ReplyDeleteजे बघितलंस ते लिहिलंस :)))
महाराज... प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राम्हण प्रतिपालक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
जय भवानी, जय शिवाजी...
जय शिवाजी, जय भवानी...
हर हर महादेव....
सर्वांना मनापासून धन्यवाद. जे मनाला आले, भावले आणि जमले तसे लिहायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तरी मला काही त्रुटी दिसत आहेत. पण असो, आपल्याला आवडले यातच भरुन पावलो.
ReplyDeleteट्रेकरसिड, अरे मित्रा जगातल्या कुठल्याही भौतिक उपाधी आणि कौतुकापेक्षा ही "शिवरायांचा मावळा" प्राणप्रिय असेल. धन्य झालोय आज मी.
Mast Pankaj....chan julun alay! sagal kasa kal parva ghadun gelya sarkha vatatay....Jivant...Khandani!
ReplyDeleteSumedh Samarth
हृदयाला भिडणारे!!! मस्तच, सुंदर लिहिलयस !!!
ReplyDeleteatishay surekh..
ReplyDeleteदिवाळीत ही पोस्ट वाचता आली नव्हती. पण तू सुंदर लिहिलं आहेस. डोळ्यांपुढे चित्र उभं राहिलं, खूप बरं वाटलं.
ReplyDeletepankaya ... gr8 nice writeup .... this one chapter of series ... when we will get next chapter ... waiting eagerly for next ...
ReplyDeleteछान लिहिले आहेस ...
ReplyDeleteपंकज, अखेरीस आज तुझी ही पोस्ट वाचली. सहीच लिहिलं आहेस ... थेट १६७३ मध्ये पोहोचवलंस सगळ्यांना.
ReplyDeleteमहाराजांची दिवाळी असं कधी मी डोळ्यापुढे आणलं नव्हतं. त्यांचा सण म्हणजे दसरा ... शिलंगण - तो साजरा करणं म्हणजे नव्या मोहिमा आखणं, स्वराज्याच्या सीमा विस्तारणं.
स्वस्थतेने दिवाळी साजरी करायला त्यांना कधी सवडच मिळाली नसेल असं वाटायचं मला :)
Kharach mavala hotas ka re ? Ashakya bhari lihlay !! hats off
ReplyDeleteपंकज, 'स्टार माझा'च्या यशाबद्दल अभिनंदन! :)
ReplyDeleteधन्यवाद अनघा... निकालाबद्दल महेंद्रजी, भुंगा यांनी लिहिले आहेच.
ReplyDeleteMitra, tu ajab rasayanach aahes .. he sadhya manasache kaam nahi .. tuzya divya drustila salaam .. Fortunate to get this to read. - Sachin
ReplyDeleteMitra khup apratim lihile ahes .. tu ajab rasayan ahes, samanya mansache kaam nahi he .. fortunate to read this :) .. hats off ..
ReplyDelete