Blog

रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ

एसीत बसे, पीसीत घुसे,
दिस काढी कसेबसे, हापिसात

अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच

दिला कामांना खो, सह्याद्रीला ओ,
मनसुबा रचियेला, जावे रतनगडी, मित्रहो.

सगळ्या मित्रांना विचारुन पाहिले. पण प्रत्येकाला काही ना काही कामं होती. एकंदर रागरंग पाहता फक्त अनिकेतू आणि…

जंगलवाटा (पेंच)

मागल्या आठवड्यात पेंचला गेलो होतो. फोटो तर टाकले होतेच, पण ब्लॉगपोस्टची बर्‍याच जणांची मागणी होती. म्हणून हा उपद्व्याप करतोय.

एखाद्या जंगलात जायचं हे नोव्हेंबरच्याच एका शूटमध्ये ठरले होते. नुकतीच “मोनू दुबे पेंच” या नावाने एक फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्टही आली होती. तेव्हा कधीतरी उपयोग होईल हे…

जुन्या डायरीतून-१

काल सहज कपाट आवरत होतो तेव्हा जुनी एक डायरी सापडली. चौदा वर्षे जुनी. कविता वगैरे असलं काही तेव्हाही जमत नव्हतं आणि आता तर प्रश्नच नाही. पण कॉलेजातली पहिली काही वर्षे गेली की बहुतेक त्या वयात प्रत्येकालाच काहीतरी खरडायची सवय जडते. १९९८ साली काही खरडायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर…

आजची बेजबाबदार(?) तरुणाई

आजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घरी आलं की पुन्हा त्या कॉंप्युटरसमोर जाऊन बसायचं. कानात हेडफोन लावून बसायचं. वैताग वैताग नुसता…!!! घरच्यांनाही आणि तरुणांनाही.
पण खरंच तरुण (किंवा तरुणी) बेजबाबदार झालेत?…

शिशिरातल्या सकाळी

शिशिराची चाहूल लागली की मनाला असे अचानक उबदार फुटवे येतात. उगाच ते गुलाबी गुलाबी झाल्यासारखं वाटतं. थंडीसारखंच. एरवी टाळला जाणारा सकाळचा तिसरा चहाही हवाहवासा वाटू लागतो. अशातच मीही बाहेर एखादा फेरफटका टाकतो.

डोळे चोळत मी बाहेर पडणार तेवढ्यात बायकोने अर्धवट झोपेत हातात स्वेटर दिलेला असतो….

Recent Photo Galleries

Animals From Pench
Birds From Pench
जंगलवाटा
Village Life

Latest Blog Posts

Follow Me

Pankaj_Bhatkya Pankaj भटकंती 

Unlimited Pankaj 

Zarekar Pankaj 

Zarekar

Archives

 

Ratangad Trek: एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात… http://t.co/fNNYrbzK