Blog

हरवले हे रान धुक्यात…

हरवले हे रान धुक्यात… पहाटेची प्रसन्न वेळ. एक कविता !

चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर
शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर

आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल पाखरांची
चंद्रमौळी झोपड्यांत सुखे ऊबदार साखरझोप लेकरांची

धुराच्या वेलांट्या उमटल्या गावाकुसातुनी
धुक्याच्या मौनी कागदाला ऊबेचा रंग येई

हरवले हे रान धुक्यात, नदी रेखिली चमकदार
दहिवर रानोरानी, कुठे गवताशी दवाचा रत्नहार

आकाशात किरणे फाकली जणू सोने उधळी
रात्री जपलेली प्रकाशाची दौत उपडी केली नभाळी

उधळला सडा प्रकाशफुलांचा क्षितिजावरून
ऊबसुगंधी ओघळे चराचरात पानापानांवरून

देवळातून उमटे काकडआरतीचा धूसर गजर
चेतन पावन होई पहिला मंगल प्रहर

गोठ्यातली किणकिण आणि दूरवर कोंबड्याची बांग
धन्याच्या शिदोरीसाठी जात्यावरल्या गाण्यांचा संग

नसे ठावभर रिकामी हिरवी पिवळी सोनशिवारं
काळ्या आईचं दान जणू रातीचं सपान साजरं

सकाळ अवतरली किलकिल्या डोळ्यांनी
मिठीत वेढले सृष्टीला सहस्त्र रेशीमधारांनी

 

17 Responses to “हरवले हे रान धुक्यात…”

  1. Soumitra says:

    Pankya surekh kavita ani photos !!!
    Ajun Kavita yeu de please !!!

  2. Sachin says:

    Apratim kavi maharaj..apratim

  3. मान्यवर,
    कवि पंकजशेठ – तुमच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला !!!!!! अफलातून.. अतिशय प्रासादिक आणि प्रवाही……. काय शब्दरचना आहे राव…
    ‘दहिवर रानोरानी’, ‘धुक्याच्या मौनी कागदाला’, ‘दौत उपडी केली नभाळी’ वगैरे phrases तर बाप्प्प्प्प जमल्या आहेत… थेट मंगेश पाडगावकर किंवा विंदा पंथातील वाट्याव्यात अश्या !!!!!!
    हे तुमचे अंग माहीत नव्हते बरं आम्हाला…… अजून काही अश्या रचना असतील तर शेअर करा…
    Proud to have friend like you :)

    • Pankaj Z says:

      मंगेश पाडगावकर किंवा विंदा पंथातील??
      >>आवरा मान्यवर स्वतःला.

  4. Vijay says:

    मस्त शब्दरचना .. :) आणि फोटो सुद्धा..:)

  5. Sumit says:

    Apratim… Nitant sundar!

    Sir, aajun ek yevu det

  6. Vishwajeet says:

    Prachand bhaari !!

  7. mahesh says:

    सुंदर लिहिले आहे

  8. अभिषेक says:

    भारी रे!

  9. mangesh patil says:

    नैत्रदीपक ………..

  10. Shrikant Shimpi says:

    Apratim !!!

  11. Yogi says:

    Lai bhari…
    गोठ्यातली किणकिण आणि दूरवर कोंबड्याची बांग
    धन्याच्या शिदोरीसाठी जात्यावरल्या गाण्यांचा संग…… Ganyacha sanga aaivaji Ovyancha sanga asa asata tar te ankhin appropriate watala asata.

    • Pankaj Z says:

      योगी, जात्यावर म्हणतात त्या ओव्याच असतात असे नाही. त्याला जात्यावरली गाणी असेच म्हणतात.

  12. Yogi says:

    बरोबर आहे तुझं…म्हणूनच मी appropriate म्हणालो चुकीचं नाही म्हणालो…… तू काढलेले फोटो आणि लिहिलेली कविता इतकी मस्त आहे कि ते वाचताना मला माझा गाव आठवलं त्यात काकड आरती चा उल्लेख त्यामुळे ते सगळं वातावरण मला परत एकदा तुझ्या कविते मुळे अनुभवायला मिळालं ह्या सगळ्यात जात्यावरच्या ओव्या तुकारामांचे अभंग हे त्या वातावरणाला आणखीनच मंत्र मुग्ध करतात म्हणून मला गाणी पेक्षा ओव्या हा शब्द जास्त appropriate वाटला. अर्थात हे सगळं तुला सांगायला पाहिजेच असं नाही पण राहवलं नाही म्हणून सांगितलं.

  13. Vaibhav says:

    Going good panku

Leave a Reply

Recent Photo Galleries

Wedding: Shruti-Rushi
Jatra
Once upon a time in Mumbai
Animals From Pench

Latest Blog Posts

Let me mail you latest posts !

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Follow Me

Pankaj_Bhatkya Pankaj भटकंती 

Unlimited Pankaj 

Zarekar Pankaj 

Zarekar

 

तू लवकर यायचंय. http://t.co/Br2SIluw