Blog

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा…

कुणीतरी ईमेल केले होतेजसेच्या तसे इथे पोस्ट करतोय. ज्याने कुणी लिहिले आहे त्याच्या निरीक्षणशक्तीला दाद द्यायला हवी

.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)

.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)

.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

* सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.
* शुक्रवार रात्र: निघायची तयारीख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज आहेहिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँटकाही ट्रेकर्सउघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)

.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

* सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसायनाईलाजाने.
* शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखालीही trek साठी भेटण्याची जागा.
* शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, . . S T stand
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह

.अन्य विशेष लकबी:

* हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबरट्रेकला जातात :)
* ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत …. साधी गोळी जरी खाल्लीतरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पणकिल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूकनसते . रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
* बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी
* यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्येप्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटीडबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीजअसते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असतेएका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेखभरतील की पाहत रहावं .

.खाण्या पिण्याच्या सवयी:

* कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
* काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
* पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचेझाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणिथोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

* खणखणित आवाजात पोवाडे गाणे
* जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
* बैटिंग ला जाणे :)

.यांची दैवते:

* offcourse शिवाजी महाराज
* रायगडचा जगदीश्वर
* हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर . .

.यांची तिर्थस्थळे:

* राजमाचीचा तलाव
* बाण चा ब्लू लगून
* नाणे घाटातील केव्ह
* कोंकण कडा . .

आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणेप्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज

* यांना मुली आवडत नाहीत

काही म्हणी आणि वाक्प्रचार :

* खाईन तर तुपाशी नाहीतर……… adjust करेन :)
* वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
* केव मध्येआला वारा गेला वारातो कुणाचा सोयरा :)
* An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!

7 Responses to “ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा…”

  1. kiran patil says:

    this is so stunning..!!
    great one..

  2. भुंगा says:

    अरे सही!
    काही म्हण… हे असं – बिंधास् लिहिणंही एका ट्रेकरचंच लक्षण आहे!

  3. भुंगा says:

    पंकज,
    अरे हा लेख सकाळ पेपर्स वरती आलाय!

    http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=23da4386-8764-4050-be5d-99d48013b62a&SID=७२७

    अभिनंदन!

  4. Pankaj - भटकंती Unlimited says:

    :-)
    मला पण ही मेल कुठून तरी फॉर्वर्ड आली होती. पण ज्याने कुणी सकाळ ला दिलाय त्याने इथूनच कॉपी केलीये हे कळतय. कारण मी काही वादग्रस्त विधाने काढून टाकूनच पोस्ट केले होते. आणि सकाळवर पण अगदी तसेच आहे.

  5. Nikhil Joshi says:

    nice post…

  6. kalpak says:

    self experiance and others expreiance sharing

Leave a Reply

Recent Photo Galleries

Wedding: Shruti-Rushi
Jatra
Once upon a time in Mumbai
Animals From Pench

Latest Blog Posts

Let me mail you latest posts !

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Follow Me

Pankaj_Bhatkya Pankaj भटकंती 

Unlimited Pankaj 

Zarekar Pankaj 

Zarekar

 

तू लवकर यायचंय. http://t.co/Br2SIluw