डोंगरातली शाळा
विसापूर ट्रेकला गेलो. तिथल्या लोकांशी पंगे घ्यायचे नाहीत हे सह्याद्रीने शिकवले.
कर्नाळा ट्रेकला गेलो. दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत खालच्या जंगलातच भरकटलो. समोर पाहिले तर कर्नाळा आणि आमच्या मध्ये एक मोठी दरी. परत आलो. सह्याद्रीने टाईम मॅनेजमेंट आणि आधी नीट माहिती काढल्याशिवाय जायचे नाही हे शिकवले.

सरसगडला गेलो. फेब्रुवारीच्याच कोकणी दमट उन्हाने हाल झाले डिहायड्रेशन झाले. अर्ध्यातून परत आलो. पण सह्याद्रीने कुठे आणि कधी जायचे असते ते शिकवले.
पदरगडला गेलो. अगदी थकल्यावरही एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन फोटो काढल्यास काय मिळते हे सह्याद्रीने दाखवून दिले.

दुर्ग-ढाकोबाला गेलो, जीपीएस कसे वापरायचे ते सह्याद्रीने शिकवले.
तुंगला गेलो, कुणाला सोबत न्यायचे नाही हे सह्याद्रीने शिकवले.
आहुप्याला गेलो. जाताना ओढ्याला पाणी घोट्याएवढे होते. अचानक धुवून काढणारा पाऊस पडला. मागे फिरलो, त्याच ओढ्याला कंबरेच्या वर पाणी. सह्याद्रीने योग्य वेळी माघार घ्यायला शिकवले.

नळीच्या ‘वाटेला’ गेलो. वरुन सुर्यास्त पाहिला. सह्याद्रीने खरे कष्ट करुन साध्य काय होते ते शिकवले.

रतनगडला गेलो. डोंगरात कसे वागायचे “नसते” हे गुज्जु लोकांनी दाखवून दिले.
तेलबेल-ठाणाळे ट्रेकला गेलो. पाणी संपून हाल झाले. हीटस्ट्रोकची भीती. सिक्रेट बाटली कधी उपयोगी पडते याचा अनुभव सह्याद्रीने दिला.
जगातल्या कुठल्याच शाळेत हे कुणी शिकवले नसते. नाही का? आता बघू या वीकेंडला कुठला क्लास घेतायेत सह्याद्री मास्तर.




Great that you are sharing all these things Manywar… Hats off to your tremendous passion for Bhatakanti… I would never imagine doing even 10% of that in my entire life time
:P
Hi Pankaj,
Namaskar!!
Sahyadri kadna barach kahi shiknyas milta fakt te apnas kalale pahije. Ha blog baghun asa vatla aajun amchi barich bhatkanti baki ahe…..Blog kharach mast ahe…….
Ahupe wala pic ek no. ahe!!
Cheers, ats
Blog ekdam masta aahe.