Blog

आता तरी येशील?

अरे आकाशीच्या नभा,
नकोय निळे आकाश,
नकोत कापशी ढग,
नकोत संध्यारंग,
नकोत अंदाज, नकोत आडाखे,
नकोत क्षितिजावर चाहुली,
कितीक देशील आता हुली,
नकोत नुसत्याच हुरहुरी.

बघ ना तूच,
रान कसेबसे राहिलेय तगून,
डोळेही शिणले वाट बघून,
ढगही चालले निघून,
जीवाला घोर राहिलाय लागून
काय मिळतंय तुला असे वागून?

आता तरी येशील?
तहान भागवशील?
दचकावून जागवशील?
अंगणात बरसशील?
तीन-तीन दिवस लागून राहशील?
मूग-बाजर्‍या तर गेल्या,
पोटापुरती ज्वारीतरी पेरु देशील?

Image Courtesy: Soumitra Inamdar

10 Responses to “आता तरी येशील?”

  1. Aarti says:

    KHUP MAST KAVITA AHE

  2. Mangesh Bhayde says:

    BEST! गेल्या आठवड्यात राजमाची केलं. फोटोग्राफी करताना प्रथमच सुंदर पांढरे फट्ट ढग नकोसे वाटले. पाऊस पायजे, गुणवंतराव! पाऊस नाय तर काय नाय!

  3. अभिषेक says:

    चातक झालेला बळीराजा आणि पाउसवेडे आलेत कवितेतल्या प्रार्थनेत

  4. Apurva says:

    मस्त आहे ! झकास. येईल येईल.

  5. हृदयस्पर्शी !!

  6. Vivek Kale says:

    फार छान !

  7. Mahesh says:

    Nice one

  8. Yo Rocks says:

    sunder

Leave a Reply

 

Recent Photo Galleries

Jatra-2013
Beautiful Baglan
Bull racing
Jagran-Gondhal

Latest Blog Posts

Inspirations !