Blog

गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा

नमस्कार मित्रहो,

ही आजची पोस्ट खास तुमच्यासाठी.

निमित्तही तसे़च. गिरिमित्र संमेलनाला जाण्याचे नक्की होत नव्हते. त्यातच लो-भी-भो (लोणावळा-भीमाशंकर-भोरगिरी) ट्रेक प्लॅन केला होता. त्यातच परवा म्हणजे शुक्रवारी सुहासचा फोन येऊन गेला.  बक्षीस मिळालंय, पण क्रमांक वगैरे न सांगता ट्रॉफीवर काय टाकायचे असे विचारले? त्याला खरं तर नक्की माहित नव्हतं की “Passion behind the lens” की “भटकंती अनलिमिटेड”? मी म्हणालो अर्थातच “भटकंती अनलिमिटेड”. आधी भटकंती, फोटोग्राफी हे त्याचे बाय-प्रॉडक्ट. आणि नंतर त्याचा मेलही आला.

नमस्कार ब्लॉगर मित्रानो ..

११ व्या गिरिमित्र संमेलनातर्फे घेण्यात आलेल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण १८ ब्लॉगर्सनि यात सहभाग घेतला होता. आपल्या परीक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन हे सर्व ब्लॉग व्यवस्थित वाचून त्यांचे निकाल पत्र काल आम्हाला पाठविले. ते खालीलप्रमाणे.
प्रथम क्रमांक – पंकज झरेकर – भटकंती अनलिमिटेड
द्वितीय क्रमांक – देवेंद्र अशोक चुरी – दवबिंदू
तृतीय क्रमांक – नचिकेत जोशी – आनंदयात्रा
उत्तेजनार्थ – हेमंत पोखरणकर – बॉर्न पीएचडी१५ जुलै रोजी गिरिमित्र संमेलनात पुरस्कार दिले जातील.सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.धन्यवाद
आयोजक, ११ वे गिरिमित्र संमेलन

तेव्हाच आनंद गगनात मावेना. पण विचार केला की हा कार्यक्रम होऊ दे मग जाहीर करु. लो-भी कॅन्सल करुन तेच सगळे सवंगडी (अमित, अजय, परिक्षित) घेऊन मुंबई गाठली. सकाळी महाराष्ट्र टाईम्सच्या बातमी/लेखाने अधिकच आनंदत भर घातली. आजच आत्ताच कार्यक्रमाहून परत येतोय. हा आनंद तुमच्याशीच शेअर करावा असे वाटले. आज दुपारी लोकप्रभाचे संपादक विनायक परब यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रथम आठवण झाली ती आदिदेवता गणेशाची, प्रत्यक्षात नसले तरी आशीर्वाद देणार्‍या पप्पांची, मी ट्रेकला गेल्यावर मागे वाट पाहणार्‍या अंजलीची, आईची, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आणि रायगडाची, नानाच्या अंगठ्याची.

हे यश खरं तर फक्त माझं नाही. हे आहे प्रत्येक गडाखालील गावातल्या पिठलं-भाकरी, आमटीभात देणार्‍या मायेचं, रस्ता दाखवणार्‍या मामांचं, ट्रेकला सोबत करणार्‍या देव्या, श्रीकांत, अजय, अमित, परिक्षित (आणि असंख्य सवंगडी) यांचं, आमच्या मराठी ब्लॉगर्सचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या वाचकांचं. आपण आहात म्हणूनच तर लिहितोय. पुढेही असाच लोभ असावा, म्हणजे मलाही काहीबाही खरडण्याची अशीच प्रेरणा मिळत राहील. हा पुरस्कार आपणालाच समर्पित.

आपलाच,

पंक्या !

36 Responses to “गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा”

  1. Jyoti says:

    अभिनंदन…. :) :)

  2. parikshit says:

    pankya tuch aahes re…..

  3. लई भारी…. कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, पण वृत्तांत कळला.

    खूप खूप अभिनंदन रे :) :)

  4. Sandeep says:

    Chhan.. you deserve it :)

  5. "हे यश खरं तर फक्त माझं नाही. हे आहे प्रत्येक गडाखालील गावातल्या पिठलं-भाकरी, आमटीभात देणार्‍या मायेचं, रस्ता दाखवणार्‍या मामांचं.."
    तुझ्या साधेपणा वर खुश..
    असाच लिहीत रहा..
    अजुन बरंच काही वाचायच आणि बघायचं आहे.. आम्हाला.

  6. ketan says:

    अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! :)

  7. Suryakiran says:

    Congratulations ! You deserve it mitra.

  8. Hemant says:

    Heartiest congrats! This blog truly deserves it. Your flow of writing is simply superb. Then let it be the trek details or the other stuff!

    And should I mention the Photographs? They are as awesome as it gets!

  9. अभिनंदन . . .

  10. अमोल नाईक says:

    मनःपुर्वक अभिनंदन पंक्या !

  11. sheetal shide says:

    Abinandan abhinandan abhinandan!!!!!

    This blog really deserves this.

    the way you write and your photography are awesome……

    Tuzya yashat tu agdi na chukta saglyana samavun ghetos……

    "हे यश खरं तर फक्त माझं नाही. हे आहे प्रत्येक गडाखालील गावातल्या पिठलं-भाकरी, आमटीभात देणार्‍या मायेचं, रस्ता दाखवणार्‍या मामांचं.."

    simply gr8

    keep it up …all the best!!!!!!!!!!!

  12. Dipak says:

    अभिनंदन… :)

  13. Nilesh Mate says:

    Congrats Dude…Keep it up..

  14. Vrinda says:

    1 no.. U truly deserve it.. am so happy.. heartiest congratulations! :) proud to be ur friend!

  15. Abhinandan!!! Ata Lo-Bhee-Bho trek la sponsor milala :P

  16. madhav kulkarni says:

    Pankaz,

    Abhinandan. KEEP TREKKING>> KEEP BLOGGING>>

    madhav

  17. pooja says:

    अभिनंदन पंकज,
    सह्याद्रीचे असेच निखळ प्रेम आणि साथ आपल्याला लाभो. आम्ही आपल्या ब्लॉगच्या प्रतीक्षेत तर असतोच.
    your blog truly deserve this title. आपण केलेल्या कामाची पोच पावती मिळाल्यावर तुम्ही जोमाने कामाला लागलाच असाल यात शंकाच नाही.
    लो -भी -भो च्या ब्लॉगची वाट पाहत आहोत. अंजली आणि आपल्या आईंचे ही मनः पूर्वक अभिनंदन.

  18. Yogesh Harane says:

    एक नंबर, मित्रा… हार्दिक अभिनंदन !!! तुझी भटकंती आणि ब्लॉगलेखन असच अनलिमीटेड चालू राहू देत…

  19. Mahesh says:

    Mitra Abhinanadan!!!!

    Khatri tar hotich re amhala tuch yenar 1st..keep it up.

  20. Rohan says:

    Many Congrats to you… I wish I could have been there at Girimitra.

  21. अभिषेक says:

    एक नंबर भारी… लिहिते रहा!

  22. Nilesh Jagtap says:

    Congrats and keep it up !!!

  23. Hemant Pokharankar says:

    Khhooop Abhinandan! ..ani ekdam mast post.

  24. Rajan Mahajan says:

    अभिनंदन !!! फोटो झकास…

  25. Ganesh says:

    Abhinandan !!!

  26. गौरी says:

    अभिनंदन रे!

  27. लई भारी पंक्या….मनापासून अभिनंदन रे …!!!

  28. Aditya Budrukkar says:

    Many Many Congratulations Mitra.
    Success Asaaach UnLimited Aso Tumchya Aayushyaat!!!

    Zordaar Photography Keli Aaahet!

  29. Shubhangi Bagde says:

    मनःपुर्वक अभिनंदन पंकज !!!

    सह्याद्रीच असंच अमाप प्रेम तुम्हाला लाभो आणि तुमची अनलिमीटेड भटकंती अशीच चालू राहो !

  30. अभिनंदन पंकज!
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  31. अभिनंदन… :) :)

  32. Abhijeet says:

    एकदम मस्त रे …
    हे सर्व पाहून खूप आनंद वाटला

  33. YJadhav says:

    Nice pankya, mastch re. Far chhan watal . Good keep it up in full positive enthusiasm.

  34. ninad says:

    अभिनंदन
    आपली भटकंती आवडली.

Leave a Reply

 

Recent Photo Galleries

Jatra-2013
Beautiful Baglan
Bull racing
Jagran-Gondhal

Latest Blog Posts

Inspirations !