तू लवकर यायचंय
“Rain Rain go away” असं आपल्याकडे शाळेत शिकवल्याचं आठवत नाही. आपण आजवर शिकत आलो ते “ये रे, ये रे पावसा”च. नाही का? हे असंच माझं नविन ये रे, ये रे पावसा

वार्याच्या सोसाट्यात वेडावायचंय
क्षितिजावरल्या ढगांकडे आशेने पहायचंय
मला गडगडाटाला घाबरायचंय
विजेच्या कडकडाटानं दचकायचंय
पण पावसा, त्यासाठी तू लवकर यायचंय !
पावसात भिजत घरी पोचायचंय
बायकोकडून डोकं कोरडं करुन घ्यायचंय
गरमागरम आल्याचा चहा प्यायचाय
सोबत कांदाभजीही खायचीये
पण पावसा, त्यासाठी तू लवकर यायचंय !
ओल्या मातीचा गंधाने मोहरायचंय
गालावर पहिला थेंब अनुभवायचाय
पहिल्या सरीत भिजायचंय
स्वतःभोवती गिरकी घेत नाचायचंय
पण पावसा, त्यासाठी …
गवताला फुटलेले अंकुर पहायचेत,
नवजीवन कशाला म्हणतात ते त्यातून अनुभवायचंय,
भलरीदादाच्या चेहर्यावरचे हसू पहायचंय
शिवार पेरणीची हाळी ऐकायचीय,
पण पावसा, त्यासाठी …
चिखलात अनवाणी नाचायचंय
पायात आणि मनात रुतलेले काटे फेकाटून द्यायचेत
शिवारात जोरात ओरडायचंय
बांधावरुन पळत जायचंय
पण पावसा, त्यासाठी …
एकटाच बाईकवरुन भिजत निघायचंय
तेव्हा मोबाईल घरी विसरायचाय
आडरस्त्याला बाईक सावकाश चालवायचीये
सोबतीला आवडती गाणी म्हणायचीत
पण पावसा, त्यासाठी …
धबधब्यात भिजायचंय
पाण्याच्या चाबकाचे फटकारे घ्यायचेत
नाकातोंडात पाणी घालायचंय
पाय घसरुन आपटायचंय
पण पावसा, त्यासाठी …
डोंगरवाटांमध्ये हरवायचंय
गडकिल्ले आपलेसे करायचेत
आडवाटा शोधायच्यात
धुक्यात हरवून जायचंय
पण पावसा, त्यासाठी मात्र तू खूप खूप लवकर यायचंय !




Faar faar apratim !!!
तुमची कमेंट म्हणजे सोने पे सुहागा!
WEDDDDD ekdam….
विश्वेश, पाऊस असाच असतो ना… वेड एकदम !
खरंच रे…… मी पण ज्याम आतुरतेने वाट पहातोय !!!!!!!!!
Excellent ….
एकटाच बाईकवरुन भिजत निघायचंय
तेव्हा मोबाईल घरी विसरायचाय
आडरस्त्याला बाईक सावकाश चालवायचीये
सोबतीला आवडती गाणी म्हणायचीत
पण पावसा, त्यासाठी …
पावसात भिजत घरी पोचायचंय
बायकोकडून डोकं कोरडं करुन घ्यायचंय
गरमागरम आल्याचा चहा प्यायचाय
सोबत कांदाभजीही खायचीये
पण पावसा, त्यासाठी तू लवकर यायचंय !
Love this part
सुं द र !
अप्रतिम…
अत्युच्य ! चातकासारखी आस अगदी सुरेख मांडलीय. आपण शब्दश: शब्दशहा आहात.
आपला " . . रहा आता आल्यासरशी " हा लेख म.टा मध्ये वाचल्यापासून मीही आता पावसाशी भावनिक बंधनात अडकलोय, अगदी तुमच्यासारखाच !
खरय … आता वेध लागलेत पावसाचे !! ७ जूनला तारखेला तळकोकण गाठणार आहे अस वर्तवण्यात आलंय. तोवर आपले शब्द आहेतच ओठांवर.
APRATIM !!!!
best!!!
Hii pankaj
Mast kavita….mumbaichya ukadyat tuzi nustya kavitene varychi zuluk yevun gelyasarkhi aahe. we are really awaiting for rain.
English medium madhe chukichi kavita shuikvtat " rain rain go away" khari kavita tar marathit aaste ji pratekala aawadte "ye re ye re pawasa"
waiting for your dhammal mastiche dhammal snaps…..with more stuffs.
"पावसात भिजत घरी पोचायचंय
……… डोकं कोरडं करुन घ्यायचंय
गरमागरम आल्याचा चहा प्यायचाय
सोबत कांदाभजीही खायचीये
पण पावसा, त्यासाठी तू लवकर यायचंय !
ओल्या मातीचा गंधाने मोहरायचंय
गालावर पहिला थेंब अनुभवायचाय
पहिल्या सरीत भिजायचंय
स्वतःभोवती गिरकी घेत नाचायचंय
पण पावसा, त्यासाठी …
he bhari awadlay aaplyala…..
mastach….
Regards
sheetal.
mastch re
Apratim!!!
)